क्राईम स्टोरी

आसिफाच्या न्यायासाठी रविवारी कोल्हापुरात कॅण्डल मार्च

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन

कठुआ येथे आठ वर्षीय आसिफावर अत्याचार केलेल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देऊन आसिफाला न्याय मिळावा यासाठी कोल्हापुरात मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा रविवारी रात्री सायंकाळी सात वाजता शिवाजी पुतळा येथून निघणार आहे.

हा मोर्चा कोल्हापुरातून सर्व लोक मिळून आसिफाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी काढत आहेत. यात कुठलाही राजकारणी व्यक्ती सहभागी नसेल. कोल्हापुरातील सर्वसामान्यांचा हा मोर्चा असणार आहे. कोल्हापुरातील शिवाजी पुतळ्याजवळ रात्री सात वाजता सर्वजण एकत्र येणार आहेत. यावेळी आसिफला श्रद्धांजलीही अर्पण करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचा हा मोर्चा असून पीडित आसिफाला न्याय मिळावा यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button