उरुळी कांचनमधे तरुणीवर चाकूने वार

उरुळी कांचन: मित्रांसोबत संबंध जुळवून देण्यासाठी बहिनीला मोबाईल दिल्याच्या कारणावरुण चिडलेल्या सौरभ कैलास चौधरी (रा. उरुळी कांचन ) या तरुणाने बहिनीच्या मैत्रिणीवर चाकूने वार केल्याची घटना उरुळी कांचन ( ता. हवेली ) या ठिकाणी घडली. याप्रकरणी जखमी तरुणीने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उरुळी कांचन येथील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणीने मित्रांसोबत संपर्क जुळवून देते यासाठी आपल्या बाहणीला मोबाईल दिल्याची माहिती सौरभ ला समजली. याच गोष्टीचा राग मनामध्ये धरुण रविवारी ( ता. 2 1 ) रात्री पावणेनऊ वाजयाच्या सुमारास मुलीचा गळा दाबून सोबत आणलेल्या चाकूने पोटात , हातावर व कमरेवर वार केले. मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून , या घटनेच अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us