…तर मी त्याचे थोबाड फोडेन : अभिनेत्री उषा नाडकर्णी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आजवर मला कधी कुणी घाटी म्हटलेले नाही. मात्र जर कोणी मला म्हणाले तर त्या माणसाचे मी थोबाड फोडेन असे अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी म्हटले आहे. त्या शिवाय गुणवत्ता असूनही पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी बोलून दाखवली.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar ) यांनी काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांना घाटी असे बोलले जात असल्याचे वक्तव्य केले होते. नेपोटिझम हा हिंदी सिनेसृष्टीत चंद्र सूर्या इतकाच लख्ख आहे असेही त्या म्हणाल्या होत्या. एक काळात मराठी कलाकारांना हिंदी सिनेसृष्टीत फारशी बरी वागणूक मिळत नव्हती. नेमक्या याच मुद्द्यावर उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अद्याप तरी कुणीही आपल्याला असे म्हणालेले नाही.

मराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो मात्र आपल्याला कुणी असे म्हणाले तर मात्र मी त्या व्यक्तीचं थोबाड फोडेन अशी रोखठोक भूमिका उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) यांनी घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput ) च्या मृत्यूबाबत बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केले. खूप चांगला मुलगा होता. त्याच्याबाबतीत जे काही घडले ते अस्वस्थ करणारे असून मनाला चटका लावणारेही आहे असेही त्या म्हणाल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like