एन.डी. स्टुडिओत उभारली भव्य गुढी!

कर्जत :पोलिसनामा ऑनलाईन
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत उदयास आलेल्या बॉलिवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शृंगाराने सजलेल्या या थीमपार्कमध्ये दि. १७ आणि १८ मार्च दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात गोविंदाच्या हस्ते भारतातील सर्वात मोठी ५१ फूट लांबीची गुढी उभारण्यात आली. मराठी नववर्षाच्या दिमाखदार सुरुवातीसाठी शोभायात्रादेखील काढण्यात आली. भारतीय नियतकालिकानुसार ‘चैत्र पाडवा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नववर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूड थीमपार्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा एन.डी.स्टुडिओत खास पारंपरिक पद्धतीने पाहुणचार करण्यात आला.

सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेल्या या थीमपार्कमध्ये केवळ हिंदीच नव्हे तर अखंड भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहायला मिळतो. कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडत असून, फिल्मी परेडचा रोमांचित करणारा अनुभव प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे. मोठ्या पडद्यावर दिसणारे भव्य राजवाडे आणि गड-किल्ल्यांचे सेट्स येथे उभारण्यात आले असून, सिनेरसिकांसाठी हे सर्व देखावे कुतूहलाचा विषय ठरत आहेत. अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या या वास्तूत प्रेक्षकांना गुढीपाडव्यानिमित्त मुक्त वावरण्याची संधी आहे.

अभिनेता गोविंदाने उभारली भव्य ‘गुढी’
You might also like