काँग्रेस नेत्याच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल

पोलीसनामा ऑनलाईन
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई गुरूपालसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीबीआयने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे (ओबीसी) 97 कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी संभौली शुगर लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला आहे. गुरूपालसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसचे नेते असून 2017 साली त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.