कॅम्प परिसरातील मंदिरातून सिद्धीविनायकाची मूर्ती चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

कॅम्प परिसरातील सेंट्रल स्ट्रीटवरील सिध्दीविनायक मंदिरातुन सिध्दीविनायकाची पंचधातुची मुर्ती चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सागर किर्तीभाई शहा (42,रा. सेंट्रल स्ट्रीट) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान चोरटयाने मंदिरात प्रवेश करून सिध्दीविनायकाची पंचधातुची अंदाजे 5 किलो वजनाची मुर्ती चोरून नेली.

मुर्तीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सागर शहा यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, सिद्धीविनायकाची मूर्तीची करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सिद्धीविनायकाची मूर्तीची करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बळीराम अवघडे (वय :21) या आरोपीला ताब्यात पकडले असून त्याच्याकडे तपास सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.आर. काटे करीत आहेत.

You might also like