कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करणाऱ्या आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
कोपर्डी केसमधील आरोपींवरील हल्याच्या केसच्या सुनावणीनंतर आरोपींवर जिल्हा न्यायाल्याच्या आवारात हल्ला करुन जीवे माण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी हल्ला करणाऱ्यांना पाच वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करताना चाैघा आरोपींना पोलीसांनी पकडले होते. तेव्हापासून आरोपींना जामिन न मिळाल्याने आरोपी कारागृहात होते.

अमोल सुखदेव खुणे (वय 25), गणेश परमेश्वर खुणे (वय 28) दोघेही रा. रुईधानोरा, ता. गेवराई, जि. बीड, बाबुराव वामन वाळेकर (वय 30, अंकुशनगर, ता. आंबड, जि. जालना), राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (वय 21 परांडा, ता.आंबड, जि. जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. हल्याची घटना न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.

मागिल वर्षी कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरु होती. 1 एप्रिल 2017 रोजीच्या नियमित सुनावणीनंतर आरोपी जितेंद्र भैलुमे, संतोष भवाळ या तीन आरोपींना पोलिस कर्मचारी न्यायालयातील लाॅकअप मधून बाहेर सबजेल कारागृहात घेऊन जाताना न्यायालय आवारातच चाैघेजण सत्तुर घेऊन आरोपींवर धावून आले होते. त्यांना पोलीसांनी त्याब्यात घेतले. मात्र या झटापटीत पोलीस कर्मचारी रविंद्र भास्कर टकले जखमी झाले होते. याप्रकरणी सहायक फाैजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व आर्म अॅक्ट 4/25 कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानूसार आरोपींना पाच वर्ष सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.