कौमार्य चाचणी प्रथे विरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणांना मारहाण

पिंपरी : कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे. याच प्रथेच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्याची गंभीर घटना पिंपरी येथे घडली आहे.

ही घटना सविवारी ( ता. २१ ) रात्री घडली असून या प्रकरणी प्रशांत इंद्रेकर ( रा. येरवडा, पुणे ) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विवेक तामचीकर आणि प्रशांत इंद्रेकर आणि त्यांच्या मित्रांनी . ”stop The Vritual” नावाचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवरून ते सतत जनजागृती करत असतात.
याच गोष्टीचा राग मनात धरुण इंद्रेकर व त्याचे कुटूंबीय एका विवाहासाठी पिंपरीत आले असता, यावेळी एका टोळक्याने त्यांना घेरलं व तु समाजाचा चालत आलेल्या प्रथेला विरोध का करतोस ? असा सवाल विचारत इंद्रेकर व त्यांच्या कुटूंबियांस मारहाण करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us