खाजगी क्लासेसचा गोरखधंदा….

पुणे (अशोक मोराळे) :
बदलती शिक्षण प्रक्रिया व पद्धती पाहता खाजगी क्लासेसचा पसारा दिवसेन दिवस वाढत आहे . त्यात घरामधील दोन्हीं पालक नोकरीला असतील तर त्यांच्या पाल्याची संपूर्ण मदार खाजगी शिक्षणावरच.
लातूर पॅटर्नचा शिक्षण क्षेत्रात उदय झाला आणि खाजगी शिकवणीचा मोठया प्रमाणात पाया घातला. राज्यामधील लातूर, नांदेड, पुणे, मुंबई, या प्रमुख शहरात खाजगी क्लासेसचा प्रभाव आढळतो. त्यात लातूर जास्त नावाजलेलं त्यामुळे पालकांच्या पसंती क्रमांक एकच ठिकाण.
सध्या राज्यात खाजगी क्लासेसचे पेव जोरात सुरू असून, पैसे कमविण्याचा सोपा धंदा म्हणून या व्यावसायाकडे पाहिलं जातयं. शिकवणीचे संपूर्ण नियम धाब्यावर बसवत क्लासेस मालकांनी आपली चांदी करूण घेतलीये. लातूर, नांदेड, पुणे या शहरात हजारो क्लासेस मालकांनी शिक्षण प्रक्रियेला गिळकृंत केलं आहे.
आता सरकार या संपूर्ण खाजगी क्लासेस मालकांना नियमांच्या एका चौकटीत बसवू पाहतयं. त्यामुळे राजरोसपने चाललेल्या या व्यावसायाला आता खिळ बसणार त्यामुळे अनेक क्लासेस वाल्यांनी आपण कसे योग्य आहोत हे समजावून सांगण्यासाठी पत्रकार परिषदा घेवून आपल्यावर कसा अन्याय होतोयं हे संघटनेच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केलीय.
राज्यमधील लातूर, पुणे, नांदेड या प्रमुख शहरात पावला – पावलावर खाजगी क्लासेसचे पीक जोरात वाढलेले दिसते. जेंव्हा हे शिकवणीचे वर्ग सुटतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो एवढे विद्यार्थी या एकाच वर्गात बसले होते का ? या शिकवणीच्या वर्गात गेल्यास तेथील परिस्थिती पाहून प्रश्न पडतो की हा शिक्षणाचा वर्ग आहे की कोंडवाडा ?
यावर सरकारने विद्यार्थी मर्यादा घातल्यानंतर सुद्धा परिस्थिती मात्र जैसे थे . अशा प्रकारची मर्यादा नको म्हणून खाजगी क्लासेस वाल्यांनी आता रडगाने सुरु केले आहे.एका विद्यार्थांकडून किती फिस घ्यायची याला काही मर्यादा नाही. आणि जरी असली तरी पाळतो कोण ?नाही म्हणायला आता शासन मानगुटीवर बसल्यास काही जण कर भरत ही असतील. पण मागील वीस वर्षात काय दिवे लावले हे मात्र जगजाहीर आहे. या अस्ताव्यस्त वाढलेल्या खाजगी शिक्षण विभागाला चाप बसावा यासाठी शासनाने बारा सदस्यीय समिती नेमलीय. या समितीने एक नियमावली तयार केलीये, त्यानुसार खाजगी क्लास वाल्यांना आपला क्लास चालवावा लागणार आहे. मात्र मनमानी कारभार करणाऱ्यां क्लास मालकांना ते जाचक वाटत आहेत. शिक्षणाच्या नावावर करोडपती झालेले हे शिक्षण माफिया आमच्यावर अन्याय झाला म्हणून कळवळताना दिसत आहेत हे मात्र विशेष.
शिक्षणासारखा मुलभूत अधिकार असलेल्या क्षेत्रात अवैधपणे घुसखोरी करून मालामाल झालेले माफिया आता मुलभूत हक्काच्या गोष्टी करत आहेत. म्हणे मुलभूत हक्काची पायमल्ली होत आहे. या खाजगी क्लास पद्धतीमुळे शिक्षण क्षेत्राला बाजाराचे स्वरुप आले आहे. आता शासकीय संस्था नावाला उरल्या आहेत. काहीजण तर आता आशा खाजगी संस्थामध्ये आपली भागदारी निर्माण करत आहेत. ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी काहीही संबध नसतो ते देखील या व्यावसायात उतरले आहेत. त्यामुळे खाजगी क्लासेस वाल्यांना शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे चांगल समजलं आहे.
यामुळे राजकीय पुढाऱ्यांना, मर्जीतल्या पत्रकारांना हाताशी धरुन आपलं उखळ पांढर करण्याच्या प्रक्रियेला मुलभूत हक्क म्हणांव का ?
वास्तविक पाहता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिकवण्या सोडल्या तर सर्वच शिकवणीवाले नियमांना केराची टोपली दाखवतात. अनेक शिकवणी धारकांनी लाखों रुपयांनी आपल्या तुंबडया भरल्या खऱ्या मात्र मलभूत , भैतिक सुविधांचा बाजार दिसतो.
विशेष मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. या संदर्भातील अनेक तक्रारी पोलिस दफ्तरी नोंद आहेत. यामध्ये काही शिकवणी चालवणाऱ्या महाभागांचाही समावेश आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावखाली मांडलेल्या गोरखधंद्याला शासन वेसन घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात बिघडलं कुठ?
वास्तव:
विज्ञान शाखेचे विषय चार phy, chem, Bio, math प्रत्येक विषयाचा वेगळा क्लास. फिस एका विषयाला १ ५ हजारापासून २५ हजारापर्यंत. एका विषयाच्या शिकवणी वर्गाला प्रवेश किमान ५००० हजार विद्यार्थी. क्लासेसची एक बॅच १००० विद्यार्थ्यांची.
५०००x२५०००=१२५०००००० वरील आकडयांची जमा बेरीज केली तर मिळणारा नफा कोटयावधीच्या घरात.
गरज़ आहे विद्यार्थासह पालकांना योग्य मार्गदर्शनाची कारण खाजगी क्लास वाल्यांच्या प्रलोभनाला हे लोक लवकरात लवकर बळी पडतात.
एवढया मोठया प्रमाणात शिकवणीला असणाऱ्या मुलांमधील किती मुलं यशस्वी होतात हा ही खरा संशोधनाचा विषय आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us