ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपांडे यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांनी दादरमधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या कन्या होत्या.

रोझा देशपांडे यांनी पाचव्या लोकसभेत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं होतं. त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय होत्या. त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रातही योगदान दिलं आहे. रोझा देशपांडे यांच्या पश्चात कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like