टोलनाक्यावर जास्त रक्कम आकारल्याने खंडणीचा गुन्हा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

नगर रस्त्यावरील टोलनाक्यावर वाहनधारकांची लूट होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सवेरा कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांवर छावणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सवेरा कंपनी ही भाजपाचे आमदार अतूल सावे यांची असल्याने हाच का परदर्शी कारभार असा सवाल वाहन चालकांमधून ऐकायला मिळत आहे.

याबाबत विनीत गिरधारीलाल यांनी फिर्याद दिली आहे. गिरधारीलाल यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते गुरुवारी नेहमीप्रमाणे टोल नाक्यावरुन जात असताना त्यांच्याकडून टोल नाक्यवरील कर्मचाऱ्यांनी अधिक रक्कम वसून केली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रिकाम्या वाहनांसाठी नियमाप्रमाणे 60 रुपये आकारणी आहे. मात्र, त्यांच्याकडून 60 रुपयांच्या तीन पावत्या देउन 180 रुपये आकारले. याविषयी गिरधारीलाल यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी गिरधारीलाल यांना दमदाटी केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधत खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools