धनगरांच्या आरक्षणासाठी लढा चालूच ठेवणार – महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

धनगर समाजाच्या युवकांना सामाजिक व आर्थिक आरक्षण मिळवून देण्यासाठीचा लढा चालूच ठेवणार. राज्य व केंद्र सरकार आरक्षणाच्या बाजूने असल्याचेही राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे आज पुणे येथे महानगरपालिकेत आले होते. तेंव्हा आरक्षणावरून प्रश्न विचारला असता ते म्हटले की ,” मी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीचा लढा शंभर टक्के प्रयत्न करून लढणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत समाजातील तरुणांनी समोर येऊन आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावा. राज्यसरकारच्या योजनांचा लाभ घेत प्रगती साधावी, त्यासाठी राज्यसरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like