नोटबंदी आणि जीएसटीचा बजेट ला फटका

पुणे प्रतिनिधी :
    पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज यंदाच्या चालू आर्थिक वर्षाचे 5 हजार 397 कोटी रुपयांचे बजेट स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षापेक्षा या बजेटमध्ये 200 कोटींची घट करण्यात आली आहे. तर गतवर्षी महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ६०० कोटीचे बजेट सादर केले होते.त्यात ३९८ कोटींनी वाढ करून स्थायी समितीने ५ हजार ९९८ कोटीचे बजेट सादर केले होते.त्या तुलनेत यंदाच्या बजेटला नोटाबंदी आणि जीएसटी चा प्रशासनाच्या बजेट ला नक्कीच फटका बसल्याचे दिसत आहे.
दरवर्षी पुणे महापालिका प्रशासनाकडून अंदाज पत्रक सादर केले जाते.कधी वाढ तर बजेटमध्ये घट केली जाते.त्याचबरोबर प्रशासनाकडून नवनवीन योजना राबविण्यावर अधिक भर दिला जातो.मात्र यंदा पुणे महापालिका आयुक्तांकडून तसे काही होताना दिसले नाही.त्यामुळे यंदाच्या चालू आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटींचे बजेट सादर केले आहे.त्यामुळे आता स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यामध्ये वाढ करणार की,या बजेट आणखी कात्री लावणार, कारण २०१७ आणि २०१८ या कालावधीत नोटाबंदी आणि जीएसटीमुळे महापालिकेच्या उत्पनावर याचा परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक ५  हजार ३९७ कोटींचे करण्यात आले आहे. तर गतवर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा २०० कोटींनी कमी आहे.यामुळे यंदाच्या स्थायी समिती मार्फत अंतिम बजेटला नक्कीच कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  तर यंदा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी वस्तू आणि सेवा करातून १८८१ कोटी मिळतील अशी शक्यता व्यक्त केली.तर पाणी योजनेसाठी ११०० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.शहरात खासगी सहभागातून घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत.पन्नास टक्के बजेट सेवकवर्ग आणि देखभाल दुरुस्तीसाठी २ हजार ७०५ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.आधुनिक तंत्राज्ञानाचा वापर करीत नागरिकापर्यंत या योजना पोहचवल्या जाणार असून रस्त्यावरील मुलांसाठी मोबाईल स्कूल मोहीम राबविण्यात येणार आहे.यातून अधिकधिक मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us