पतीच्या संमतीशिवाय मेल अकाउंटचा वापर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
ऑनलाईन व्यवहारामुळे जितक्या सोयी तितक्या गैरसोयी निरमण झाल्या आहेत. यातून लहान-मोठे गुन्हे शहरात घडत आहेत. पतीच्या संमतीशिवाय पत्नीने पतीच्या मेल अकाउंटचा वापर करून इन्कम टॅक्स रिटर्न कागदपत्रांच्या प्रति वेबसाइटवरून काढून घेतल्या. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नी व मेहुण्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गवळीनगर भोसरी येथे हा प्रकार घडला.

जीवन केदारी (३५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन केदारी यांची पत्नी व मेव्हणा यांनी मिळून जीवन केदारी यांच्या मेल अकाउंटचा युजर नेम व पासवर्ड चोरला. मेल अकाउंट उघडून पासवर्ड व मोबाइल नंबर बदलला. त्यानंतर त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न कागदपत्रांचे व इन्कम टॅक्सच्या प्रति वेबसाइटवरून काढून घेतल्या. या प्रकरणी जीवन केदारी यांच्या पत्नी व मेव्हण्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, निरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.