पद्मावत’ बघणे तरुणीच्या जीवावर बेतले

हैदराबाद : पद्मावत वरून इतके राजकारण होत असताना अत्यंत लाजिरवाणे प्रकार तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये घडत आहे. ‘पद्मावत’ सिनेमा पाहायला गेलेल्या एका तरुणीवर थिएटरमध्येच बलात्कार झाल्याने खळबळ उडाली. सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणाबरोबर ती तरुणी चित्रपट पाहायला गेली होती. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

दोन महिन्यापूर्वीच सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पहिल्यांदा दोघे २० दिवसापूर्वी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये भेटले होते. त्यानंतर या आरोपीने तिला त्याच्या बहिणीच्या घरी नेले होते.

हे दोघे ३१ जानेवारीला ‘पद्मावत’ चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले असताना कमी प्रेक्षक असल्याचा गैरफायदा घेत हा गुन्हा केला. संबंधित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी थिएटर मालकाविरोधातही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जनगाव जिल्ह्यातील रहिवासी असून तो चालक आहे.

You might also like