पुणे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

ठिकठिकाणी घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या, फुलांची तोरणे, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले तरुण तरुणी, हातात तलवार घेऊन रथात बसलेले बाल शिवाजी, आकाशाला भिडणारे भगवे ध्वज अाणि जय भवानी जय शिवाजीचा आसमंत भेदनारा जय घोष अशा उत्साही वातावरणात पुण्यात शिवजयंतीच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. सकाळी सरुवातीपासूनच तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सरदारांचे चित्ररथ साकारले होते. हे त्यांच सहावे वर्ष असून या मिरवणूकीमध्ये जवळपास 65 चित्ररथांनी सहभाग घेतला होता.शहरातील विविध भागामध्ये शांततेच्या वातावरणात मिरवणूका पार पडल्या या वेळी शहर पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.