पुना हॉस्पीटलचे संस्थापक मुकुंददास लोहिया यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुना हॉस्पीटलचे संस्थापक तथा अध्यक्ष मुकुंददास लोहिया यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी निधन झाले. ते पुरूषोत्तम लोहिया यांचे वडिल आणि आदित्य लोहिया यांचे आजोबा होते.

मुकुंददास लोहिया हे ८३ वर्षाचे होते. माहेश्वरी समाजाच्या जनकल्याण संस्थेचे संस्थापक तसेच महेश बँकेचे ते फाऊंडर डायरेक्टर होते. लोहिया यांच्या निधनामुळे लोहिया परिवारासह संपुर्ण माहेश्वरी समाजावर शोककळा पसरली आहे. मुकुंददास लोहिया यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या मुंकुंदनगर येथील सत्यम शिवम सुंदरम या निवासस्थानातुन निघणार असून वैकुंठात साडे नऊ वाजता पोहचणार आहे.