पोलिसांची तरुणीला बेदम मारहाण

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यावर लघुशंका करण्यास आक्षेप घेतल्याने मद्द्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणीला आणि तिच्या वडीलांना मारहाण करत तिचे कपडे फाडले. मारहाण करणाऱ्यांत एका स्थानिकाचाही समावेश आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील दापोडा येथे घडली. दोन्ही पोलीस कर्मचारी नारपोली ठाण्यात नेमणूकीस असून त्यापैकी दोघांना शैलेश पाटील, जाधव हे दोन पोलीस व दिनेश पाटील या स्थानिकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गुंदवली येथील राहणारी आहे. ती मुंबईहून ग्रामसेवक भरती परीक्षा संपवून परतत होती. त्यावेळी दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशन येथील प्रवेशद्वारापाशी ती वडीलांची वाट पाहात उभी असताना तेथे साध्या गणवेशातील दोन मद्यधुंद व्यक्ती आल्या. त्यांनी तेथे तिच्याजवळच लुघशंका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने दोघांनाही हटकले. त्यानंतर दोघांनी आम्ही पोलीस आहोत. आम्ही कोठेही काहीही करू शकतो.असे उत्तर देत तिला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी तिला मारहाण केली. तसेच तिचे कपडेदेखील फाडले. त्यानंतर काही वेळातच तिचे वडील तेथे आले. त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी स्थानिक एकासोबत वडीलांवरही हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस शिपाई शैलेश पाटील, व त्याच्या दोन्ही साथीदारांवर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे.

Loading...
You might also like