पोलीस भरती मैदानी चाचणी परिक्षेच्या तारखेत बदल

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी परिक्षा सुरु आहे. मात्र, दि.१८ मार्च रोजी भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे सदर तारखेस बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना ३१ मार्च व १ एप्रिल रोजी बोलवण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत पोलीस भरतीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या नेमणूका करणे आवश्यक आहे.त्यामुळे दि. १८ मार्च रोजी मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांच्या तारखेत बदल करण्यात आले असून, दि. १८ मार्च रोजी भरती प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दि. ३१ मार्च व १ एप्रिल रोजी बोलविण्यात आले आहे.

आवेदन अर्ज क्र. ११०१२१००००५८०६ ते ११०१२१००००६५८७ एकून ७५० या उमेदवारांना दि. ३१ मार्च रोजी बोलाविण्यात आले आहे. तर, आवेदन अर्ज क्र. ११०१२१००००६५८८ ते ११०१२१००००७३८९ एकून ७५० या उमेदवारांना दि. १ एप्रिल रोजी बोलविण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like