प्रियांका दडस यांची सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड

बारामती: पोलीसनामा आॅनलाईन

माळेगाव बु. (ता. बारामती) येथील शेतकरी कुटूंबातील प्रियांका आबासाहेब दडस यांची सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. प्रियांका यांनी मुख्य परिक्षेत एन.टी. सी प्रवर्गातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले. त्यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या काॅलेज आॅफ इंजिनिअरींग बारामती येथून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली आहे.