‘बबन’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

पुणे :  पोलीसनामा आॅनलाईन

‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा आगामी बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘बबन’ या मराठी चित्रपटाचा रोमान्स, अ‍ॅक्शन, टेरर, दोस्ती यांचा धमाकेदार पॅक असलेला ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा चित्रपट येत्या 23 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘बबन’ ही ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकाची कथा आहे. या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे चित्रपटात पाच गाणी असून प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचं आहे.

या चित्रपटातील, सपान भुर्रर्रर्रर्रर्रर्र झालं… या बहूप्रतिक्षित गाण्याचे गीतकार सुहास मुंडे असून आेंकारस्वरुप यांनी गायले आहे.

 

https://youtu.be/XXbl0S0k8hA