ब्लू स्प्रिंग्ज सोसायटीने राबविला एक आदर्श उपक्रम

आंबेगाव (कात्रज) : पोलीसनामा ऑनलाईन

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत सामाजिक भान ठेऊन जागतिक आरोग्यदिनाचे निमित्ताने आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर अतिशय जागरुक आणि समाजोपयोगी कल्पना. होय आंबेगाव कात्रज पुणे, येथील ब्लू स्प्रिंग्ज सोसायटीने आयोजित केलेल्या या शिबिरात शंभरपेक्षा जास्त सदस्यांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन, तर पन्नास पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

७ एप्रिलला असलेल्या आरोग्यदिनाचे औचित्य साधून रविवारी ब्लू स्प्रिंग्ज सोसायटीने रक्तदान शिबिराचे नियोजन करत सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण दिले आहे. या बरोबरच रक्तदाब, इ.सी.जी. , डोळ्यांची व नंबरची तपासणी, हिमोग्लोबिन व ब्लड-शुगर या रक्त तपासण्या करण्यात आल्या.

सोसायटीमधील ज्येष्ठ सदस्यांनी उदघाटन केले. उपस्थीत डॉक्टरांनी प्रस्ताविक आणि मार्गदर्शन केले. शिबिरासाठी भारती हॉस्पीटल ब्लड बँक, भारती आयुर्वेद हॉस्पीटल आणि डॉक्टरांनी उत्तम सहयोग दिला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये ब्लू स्प्रिंग्ज सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्लड बँक तर्फे रत्कदात्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. हॉस्पीटल तर्फे सोसायटीला प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

ब्लू स्प्रिंग्ज सोसायटीने केलेल्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन इतर संस्थांनी सुद्धा जास्तीत् जास्त शिबिरांचे आयोजन करून समाज उपयुक्त असे कार्य केल्यास एक चांगली सुरुवात होऊ शकेल. कारण अत्यंत महत्वाचे म्हणजे रक्तदान हेच जीवनदान होय.