भद्रावती पोलिसांची ‘कोंबड’ बाजारावर धाड, 13 लाखाच्या मुद्देमालासह 11 आरोपींना अटक

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – भद्रावती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कोंबडबाजारावर टाकलेल्या धाडीत १३ लाख २६ हजार १२० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ११ आरोपिंना अटक करण्यात आली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रावती पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या चेक तिरवंजा गावाजवळील अमराईमध्ये दि.२७ सप्टेंबर रोजी काही लोकं कोंबडबाजार भरवून पैशाची बाजी लावत आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता रोख रक्कम,कोंबडे आणि इतर साहित्य असा एकूण १३ लाख २६ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच ११ आरोपिंना अटक करण्यात आली.त्यात प्रशांत मंत्रीवार(२१)रा. दुर्गापूर,विजय महाजन(४२)रा.तुकूम चंद्रपूर, सुदाम निमकर (३५) रा.तुकूम चंद्रपूर,अमित हेमके(३१)रा. घुटकाळा वार्ड चंद्रपूर,प्रतीक हजारे(२५)रा. जटपुरा वार्ड चंद्रपूर, संंजय सुमटकर(३०)रा. कवठी,शंकर येरगुडे(२५)रा.चेक तिरवंजा, ज्ञानेश्वर वनसिंग(२८)रा.छोटा नागपूर,आनंद झाडे(४०)रा.छोटा नागपूर,राजेश वाढई (३०)रा.ऊर्जानगर कोंढी आणि दिनेश लांजेकर (४७) रा.घुटकाळा वार्ड चंद्रपूर यांचा समावेश आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील सिंग पवार,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार,पोलिस शिपाई हेमराज प्रधान,केशव चिटगिरे,शशांक बदामवार यांनी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like