भयानक ! पती, सासु, सासरा, नणंद आणि दीराने विवाहीतेस बळजरीने अ‍ॅसिड पाजले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पती, सासरा, नणंद आणि दीराने बळजबरीने विवाहीतेच्या तोंडात अ‍ॅसिड टाकल्याची भयानक घटना शहरातील पुंडलिकनगर परिसरात घडली असुन याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विवाहीतेच्या पतीला अटक केली असुन न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश शनिवारी दिला आहे.

बाळु उत्‍तम जाधव असे आरोपी पतीचे नाव असुन त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यास शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. काळे यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्यास सोमवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी विवाहीता विद्या बाळु जाधव (23) यांनी फिर्याद दिली होती.

विद्या आणि बाळु यांना दोन मुले आहेत. दि. 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बाळु हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्याने काही एक कारण नसताना विद्याला शिवीगाळ करून बेल्टने बेदम मारहाण केली. दरम्यान, विद्याचे सासु, सासरे देखील तिला शिवीगाळ केली. दि. 3 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विद्या झोपली होती. त्यावेळी पती बाळु आणि सासुने तिच्या तोंडात बळजरीने अ‍ॅसिड टाकले.

विद्याचे सासरे, दीर आणि नणंद यांनी विद्याच्या तोंडात अ‍ॅसिड टाकताला तिला पकडून ठेवले होते. सासरच्या मंडळीकडून होणार्‍या छळाला कंटाळून आणि अ‍ॅसिड पाजण्याचा प्रयत्न झाल्यानंतर विद्याने पोलिसांकडे धाव घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन बाळु जाधवला अटक केली आहे. इतर आरोपी पसार झाले असुन त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Loading...
You might also like