भाजप मित्रपक्षांसह मेघालयमध्येही सत्ता स्थापन करणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपने ईशान्य भारतात त्रिपुरा आणि नागालँडनंतर मेघालयमध्येही सरकार स्थापन करणार असे सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेघालयमध्ये भाजप नेते एनपीपी, यूडीपी आणि एचएसपीडीपीसह 29 आमदारांची यादी घेऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. बहुमतासाठी आवश्यक असणाराआकडा मात्रपूर्ण होत नाही. मेघालयमध्ये बहुमतासाठी 30 सदस्यांची गरज आहे.

सत्ता स्थापन करण्याची सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते. शिवाय उद्याच शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशीही भाजपमधील सूत्रांची माहिती आहे. एनपीपी नेते कोनरेड संगमा मेघालयचे मुख्यमंत्री असू शकतात. यूडीपी प्रमुख दनकपूर रॉय यांनी यासाठी पाठिंबा दिला आहे. तर मेघालयमध्ये 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि कमलनाथ यांनीही राज्यपालांची भेट घेतली असून तेही सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत.

भाजपला एका अपक्षाचाही पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा सहज गाठता येऊ शकतो. असे एका भाजपनेत्याने सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. मेघालयमध्ये सध्याचे पक्षीय बलाबल असे आहे , भाजप – 2,काँग्रेस – 21,यूडीपी – 6,एनपीपी – 19,अन्य – 11 एकूण =३०.

Loading...
You might also like