भारतीय डाक विभागात (INDIAN POST OFFICE) १७३५ जागांची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक आदी पदांसाठी १७३५ जागांवर भरती होणार असल्याची सूचना काढण्यात आली आहे. यासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी १० वी पास असावा. आणि तो ज्या ठिकाणी नोकरी करेल तेथील स्थानिक भाषेचं ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे.

भारतीय डाक विभागात झारखंड पोस्टल सर्कल, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये १७३५ जागा उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांना डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा आहे. अशा उमेदवारांनी ५ जुलै २०१९ पर्यंत खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.

वयाची अट : १८ ते ४०

झारखंड एकूण जागा : ८०४

दिल्ली एकूण जागा : १७४

हिमाचल प्रदेश : ७५७

अर्ज शुल्क : ओसी / ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना १०० रुपये, एससी / एसटी / पीडब्ल्यूडी श्रेणीतील महिला उमेदवारांना फी नाही.

निवड प्रक्रिया : मेरिट लिस्टच्या आधारावर निवड केली जाईल.

आरोग्य विषयक वृत्त –

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी
अशी घ्या मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे : अशी ओळखा ब्रेन ट्यूमरची लक्षणे

क्रिम्सने नव्हे, व्हिटॅमिन्समुळे स्ट्रेच मार्क्स होतात नाहीसे

Loading...
You might also like