मान्यवरांच्या उपस्थितीत दीपक मानकर यांचा वाढदिवस साजरा

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाइन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचा वाढदिवस आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मानकर यांना शुभेच्छा दिल्या.

परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीर पत्नी रसुलन बीबी यांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन मानकर आणि परिवारास सदिच्छा दिल्या. त्यांचे अभीष्टचिंतन केले. रसुलन बीबी यांचे समारंभस्थळी आगमन होताच ‘भारत माता की जय’ ह्या घोषणा देण्यात आल्या.

स्वागत समारंभाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधीज्ज्ञ भास्करराव आव्हाड, सर्व पक्षांचे नगरसेवक, पालिका, पोलीस आणि अन्य क्षेत्रातील शासकीय अधिकारी वर्ग, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते आणि पुण्यातील गणपती मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टसाठी तीन टन धान्य यावेळी भेट देण्यात आले.