मोशीत सलायनमधून विषारी इंजेक्शन घेऊन डॉक्टरची आत्महत्या

मोशी: पोलिसनामा ऑनलाईन

मोशी येथील एका डॉक्टरने राहत्या घरामध्ये सलायनमधून विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी आकराच्या सुमारास उघडकीस आली. या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

महेश महादेव मोहिते (वय-28 रा. मोशी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांचे भोसरी येथे जयहिंद नावाचे रुग्णालय आहे. आज सकाळी काही रुग्ण घरी आले होते. त्यामुळे त्यांना उठवण्यासाठी भाऊ गेला. परंतू खोलीमधून कोणताच प्रतिसाद न आल्याने त्याने रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी महेश यांनी  बेडच्या जवळ असलेल्या खिडकीला सलायन लावल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणी विषारी औषधाचे इजेक्शन आढळून आले. त्याने महेश यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पंरतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. डॉ. महेश यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून न ठेवल्याने त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Loading...
You might also like