रणवीर सिंगला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या खिलजीच्या भूमिकेसाठी त्याला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार दिला जाणार आहे. दादासाहेब फाळके ‘एक्सिलन्स अवॉर्ड समिती’तर्फे हा पुरस्कार घोषित केला आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटात त्याने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटाने भरपूर कमाई केली असून ३०० कोटींचा गल्ला जमावणारा हा रणवीरचा पहिला चित्रपट ठरला आहे. बॉलिवूड मधील सुपरस्टार रणवीर सिंगसोबतच अभिनेत्री अनुष्का शर्मालाही दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संबंधित घडामोडी:

अनुष्का शर्माला‘दादासाहेब फाळके पुरस्कार’होणार प्रदान

You might also like