राणेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता ?

मुंबई : कॉंग्रेसचा हात सोडून महाराष्ट्रात स्वाभिमानी पक्षाची स्थापना करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत पाठवण्याचा विचार भाजपाच्या गोटात सुरु आहे.
महाराष्ट्रात राणे यांना सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ दिल्यास शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळे राणे यांना मंत्रीपदाची खुर्ची देण्यासाठी इतर मार्ग शोधले जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारासंबधीच्या चर्चेतला गतिरोधक कायम असल्यामुळे या पर्यायाचा विचार केला जात आहे. राज्यात रिक्त होणाऱ्या जागांची वाट पाहत बसण्यापेक्षा भाजपाची सत्ता असलेल्या एखाद्या राज्यातून राणे यांना राज्यसभेत पाठवता येईल क? याचा ही विचार केला जात असल्याचे सुत्रांकडून समजते.
मागील काही दिवसापुर्वी राणे यांनी जाहीरपणे केलेली विधाने, पक्ष नेतृत्वाला आवडले नसल्याचेही सांगण्यात येते. मात्र निवडणूकांना एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना राणे सारख्या स्वतःहून भाजपप्रणित आघाडीत सामिल झालेल्या दिग्गज नेत्याला सामील करुण घेता आले नाही तर भाजपकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ थांबेल असे भाजप मधील अनेक नेत्यांचे मत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us