लोकलवर दगडफेक; प्रवाशाच्या हाताची नस तुटली

कर्जत :पोलिसनामा ऑनलाईन
मध्य रेल्वेच्या शेलू ते नेरळ रेल्वे स्टेशन दरम्यान कर्जत लोकलवर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याने रोहिदास शिवाजी सिनारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रोहिदासवर नेरळ येथे प्राथमिक उपचार करून नंतर रेल्वेतील त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला उपचारासाठी बदलापूर येथे नेले. रोहितला दगड इतका जोरात लागला की त्याच्या हाताची नस तुटली असून ऐन होळीत असा दुर्दैवी प्रकार घडल्याने होळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.

You might also like