वर्ध्यात पोलीस शिपायाच्याच घरी चोरट्यांचा डल्ला

पोलीसनामा आॅनलाईन-
बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोखड व सोन्याचे दागिने  लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर कोराते असे चोरी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहेत. पोलिस शिपायाच्याच घरी दिवसाला ढवळ्या  चोरी झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. चोराने दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील सोन्याच्या  दागिन्यासह मुद्देमाल लांबविला. ज्यांच्या खांद्यावर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच पोलिसाच्याच  घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us