वाहतूक पोलिसांना मारहाण करणारे तीन कोळीबांधव गजाआड

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन

कोळी बांधवांच्या पालखी मिरवणुकी दरम्यान तीन वाहतूक पोलीस आणि दोन वार्डनला जमावाने मारहाण केल्याची घटना लोणावळा येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा प्रकार लोणावळ्यातील कुमार चौकात घडला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलीस हवालदार आनंद देवेंद्र रावण, पोलीस शिपाई सि.एफ. गव्हाणे, जिवन आंकुश गवारी, वार्डन प्रकाश मराठे, दर्शन गुरव यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आक्षय गावडे (वय- 24, रा. सावरकर नगर, ठाणे), प्रतिक साईनाथ पाटील (वय -28, रा. बालकुंभ, ठाणे) आणि दया माणिक पाटील (वय -23, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोळी बांधवांची आज पालखी मिरवणुक निघाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुक लोणावळ्यातील कुमार चौकात आली असता या ठिकाणी पोलिसांनी त्यांना यु टर्न घेण्यास मनाई केली. वाहतूकीला आडथळा निर्माण होणार असल्याने पोलिसांनी त्याना यु टर्न घेण्यास मनाई केली. त्यावेळी काही कोळी बांधवांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या काही कोळी बांधवांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. पोलिसांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगून कारवाई करणार असल्याच सांगितले. या वरुन चिडलेल्या काही कोळी बांधवांनी दोन पोलिसाना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

हा सर्व प्रकार कुमार चौकात सुरु असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीसाठी असलेले दोन वार्डन मदतीसाठी धाऊन आले. चिडलेल्या काही कोळी तरुणांनी दोन पोलीस आणि दोन वार्डन यांना मारहाण केली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार युवराज बनसोडे हे करीत आहेत.