‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची निवड

नवी दिल्ली : व्रतसंस्था

विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.

विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केले. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.