वेतनवाढीला ५०० डॉक्टरांचा विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात वेतनवाढ करण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांनी आंदोलन आणि संपाचे हत्यार उपसल्याचे आपण बघतो. परंतु, कॅनडाचे डॉक्टर याला अपवाद ठरले आहेत. मेडिकल फेडरेशनकडून केलेल्या वेतनवाढीला ५०० डॉक्टरांनी विरोध दर्शवला आहे. हे डॉक्टर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी वेतनवाढीविरोधात ऑनलाइन याचिका दाखल केली. डॉक्टरांनी वेतनवाढ करण्यापेक्षा तो पैसा आरोग्य सेवेसाठी वापरा, असे डॉक्टरांनी याचिकेत म्हटले आहे.

क्यूबिकमधील ५०० डॉक्टरांनी एकत्र येत वेतनवाढीला विरोध दर्शवला आहे. डॉक्टरांनी ऑनलाइन याचिकेत म्हटले, ‘आम्ही क्यूबिकचे डॉक्टर, आमच्या मेडिकल फेडरेशनकडून केलेल्या वेतनवाढीला आमचा विरोध आहे. आमची वेतनवाढ करण्यापेक्षा आरोग्यसेवा अधिक चांगली कशी होईल यासाठी त्या पैशांचा वापर करावा, असे आम्हाला वाटत आहे.
डॉक्टरांसोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची स्थिती काही ठीक नाही. रुग्णही आनंदी नाहीत. अशात केवळ डॉक्टरांची वेतनवाढ करणे चुकीचे आहे. जर आमचे सहकारी आनंदी असतील. उपचार करण्यासाठी आलेले रुग्ण संतुष्ट असतील तर आम्हाला आनंद होईल. डॉक्टरांसाठी रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पैशांपेक्षा कितीतरी अधिक आनंद देणारा असतो.
डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयावर आरोग्यमंत्री गेटन बारेटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. जर डॉक्टरांना वेतनवाढ नको असेल तर त्या पैशांचा चांगल्या कामासाठी वापर करू,”असं आश्वासन मी डॉक्टरांना देतो, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
असे संवेदनशील चित्र भारतात दिसण्यासाठी कित्येक महिने किंबहुना वर्षे वाटच पाहावी लागेल.

You might also like