वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवका विरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पैशाचे आमिष दाखवुन इंदापूर येथील रूपाली लॉजवर महिलांना बोलावुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रसेच्या नगरसेवकासह लॉजच्या व्यवस्थापकावर इंदापूर पोलिस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अनिकेत अरविद वाघ (रा. इंदापूर) आणि अजय बाळासाहेब शिंदे (रा. इंदापूर) यांच्याविरूध्द पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सजन विठोबा हंकारे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर येथे खडकपुरा भागातील रूपाली नावाच्या लॉजवर अजय बाळासाहेब शिंदे आणि अनिकेत अरविद वाघ हे पैशाचे आमिष दाखवुन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती  पोलिसांना शुक्रवारी मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी अप्पर पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची तयारी केली. एका बनावट ग्राहकासह पोलिस छापा टाकण्यासाठी खडकपुरा येथे गेले. शुक्रवारी सायंकाळी पोलिस पथकाने रूपाली लॉजवर छापा टाकला असता तेथे त्यांना लॉजवर वेश्याव्यवसाय होत असल्याचे आढळुन आले.

लॉजवर असलेल्या महिलांकडे चौकशी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पिटा कायद्यान्वये इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रूपाली लॉज हा वाघ यांचा असून अजय शिंदे हा तेथे व्यवस्थापक असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाकडून अशा प्रकारचा गोरख धंद्या केल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हयातील राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा अधिक तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सजन विठोबा हंकारे करीत आहेत. अनिकेत अरविद वाघ हे इंदापूर नगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like