माजी पंतप्रधानांचे बंधू शहबाज शरीफ यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटक !

वृत्त संस्था :- पाकिस्तान (Pakistan)चे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif ) यांचे बंधू शहबाज शरीफ (Shehbaz Sharif ) यांना आज (सोमवार दि 28 सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. शहबाज शरीफ यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. या घटनेनंतर आता पाकिस्तानच्या राजकारणामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शहबाज शरीफ यांच्यावर नुकतीच 42 मिलियन डॉलर्सच्या मनी लाँड्रींग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी लाहोर कोर्टात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु सोमवारी कोर्टानं ही विनंती मान्य केली नाही. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. शहबाज शरीफ सध्या पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते नवाज शरीफ यांच्या अनुपस्थितीत पीएमएल (एन)चे प्रमुख आहेत आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री देखील होते.

या प्रकरणात शहबाज शरीफ यांच्याशिवाय त्यांच्या 2 मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहबाज शरीफ यांच्या कुटुंबावर 177 संशयास्पद व्यवहार केल्यााचा आरोप आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याविरोधात 25 हजार पानांचे पुरावे एनएबीकडे (NAB) आहेत. या संपूर्ण प्रकरणात शहबाज शरीफ यांच्या कुटुंबाच्या 6 सदस्यांसह एकूण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवाज शरीफ यापूर्वीच दोषी आढळले आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानाच्या बाहेर असून लंडनमध्ये रहात होते.

नवाज शरीफ यांना कोर्टात हजर रहावं लागतं. परंतु ते पाकिस्तानात परत येत नाहीत. अलीकडेच ते विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यांना या प्रकरणात गुंतवण्यात आल्यचा आरोप करण्यात आला. दरम्यान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष इम्रान सरकार विरोधात निषेध करत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like