शास्तीकराच्या विरोधात शिवसेना काढणार महामोर्चा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

पिंपरी चिंचवड मध्ये अनाधिकृत मिळकतीवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढणार असल्याचे आज खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदमध्ये जाहिर केले. या पत्रकार परिषदेला आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, शहर संघटीका सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, रोमी संधू, माधव मुले उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात अनाधिकृत बांधकामाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनधिकृत बांधकामांना महापालिका मिळकत कराच्या दुपटीने शास्तीकर लावते थकीत असलेला शास्तीकर संपुर्ण भरल्या शिवाय मिळकत कर भरूण घेतला जात नाही. आजपर्यंत ५०० कोटी पेक्षा जादा शास्तीकर भरणा बाकी आहे.

शहरामध्ये ७५ हजाराच्यावर अनाधिकृत बांधकामे असून अनाधिकृत बांधकामाच्या मिळकत कराच्या नोंदी नसलेल्या हजारो बांधकामे आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान घोषणा केली होती, पिपंरी चिंचवड महापालिकेत सत्ता आल्यास अनाधिकृत बांधकामे नियमीत केले जातील व शास्तीकर पुर्णत: माफ केला जाईल भा.ज.पा.च्या स्थानिक नेत्यांनीही अनेक वेळा शास्तीकर माफीच्या घोषणा केल्या. गेल्या विधानसभा आधिवेशन काळातही शास्तीकर माफीचा आदेश काढला जाणार असल्याचे सांगीतले. पंधरा दिवस झाले तरी शास्तीकर माफीचे घोडे कोणत्या पाण्यात आडले हे समजत नाही पिंपरी चिंचवड शहरातील नागरीक मिळकत कर विभागाकडून होणाऱ्या शास्तीकराच्या जाचा मूळे पुर्नतः हैरान झाला आहे. शास्तीकराची रक्कम न भरल्याने काही मिळकती महापालिका करसंकलन विभागाच्यावतीने जप्तही केल्या आहेत. ३१ मार्च पूर्वी ७ कोटी शास्तीकर वसूलही करण्यात आला असून मिळकतकर भरण्यापूर्वी शास्तीकर भरण्याची अट असल्याने मोठ्या प्रमाणावर मिळकत कर भरला गेला नाही त्यामुळे मिळकत कराचे उत्पन्नही महापालिकेचे घटले आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आज महापालिका भवनातील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शास्तीकराच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शास्तीकर पूर्वलक्षी पूर्णतःहा माफ करावा या साठी महामोर्चा काढणार असल्याचे सांगीतले खासदार श्रीरंग बारणे म्हणाले अनाधिकृत बांधकामे नियमीत व्हावी व शास्तीकर पूर्णतः माफ केला जावा या करता शिवसेना पहिल्या पासून आग्रही आहे. शिवसेनेच्या वतीने या मागणी साठी अनेक वेळा मोर्चा काढले, आंदोलन केले, मुख्यमंत्र्यांना भेटून अनेक वेळा मागणीही केली. परंतु आजपर्यंत पिंपरी चिंचवड करांना आश्वासना पलीकडे काही मिळाले नाही. अनाधिकृत बाधकामे नियमीत करण्याचा आदेश काढला गेला परंतु त्याचा फायदा सर्वसामान्य नागरीकांना कोणताही झाला नाही. ज्या व्यवसायीकांनी अनाधिकृतपने इमारती उभा केल्या त्यांना मात्र याचा लाभ मिळाला. अनाधिकृत बांधकामे नियमीत करण्याच्या अटी शर्ती व दंड एवढा जाचक आहे. त्यांमुळे सर्वसाधारण नागरीक अर्ज करण्यास धजावत नाही अनाधिकृत बाधकामे नियमीतीकरणाचा आदेश हा केवळ कागदवरच राहीला असुन त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य मिळकत धारकांना झाला नाही.

शास्तीकर माफीच्या केवळ घोषणा चालु असुन शहरातील नागरीकांकडुन जबरदस्तीने शास्तीकर वसूल केला जात आहे. या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असुन शिवसेनेच्या वतीने संपुर्ण शहभर शास्तीकर विरोधात जनजागृती करण्यात येणार असुन  येत्या पंधरा दिवसात शास्तीकर माफीचा आदेश राज्यशासना कडुन काढण्यात आला नाही तर शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भव्य महामोर्चा काढण्यात येण्यार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगीतले