शिवजयंतीच्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

भोसे (ता. मंगळवेढा) : पोलीसनामा आॅनलाईन

शिवजयंतीनिमित्त गावातून काढण्यात आलेल्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावात घडली आहे. अनिल ताटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गावामध्ये सायंकाळी सहा वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सामील झाले होते. मिरवणूक अंतिम टप्प्यात आली असताना मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनिल ताटे या युवकाचा अचानक त्रास जाणवायला लागला त्यात त्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने जागीच मृत्‍यू झाला. भोसे बसस्थानकावर बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्याला मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनिल ताटे हा गावात बसस्थानक परिसरात पानपटपरी चालवत होता. एक उत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध होता. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या युवकांचा शिवजयंती मिरवणूकीत दुर्देवी मॄत्यू झाल्यामुळे भोसे गावावर शोककळा पसरली आहे.

You might also like