शिवजयंतीच्या मुहूर्तावर साकारली शिवाजी महाराजांची 15 फूटी रांगोळी

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन

शिवजयंतीच्या मुहूर्तावर एका ध्येय वेड्या कलाकाराने 15 फूट रुंद तर 22 फूट उंचीची रांगोळी साकारली आहे. सन्मेश पांडे असे या कलाकाराचे नाव आहे. सन्मेश पांडे याने शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र देहू येथे ही भव्य आणि दिव्य ही रांगोळी साकारली आहे.

श्री क्षेत्र देहू येथे रात्री बारा वाजता संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात शंख निनाद झाला आणि सन्मेशने रांगोळी साकारण्यास सुरुवात केली. 15 फूट रुंद आणि 22 फूट उंच अशी भव्य रांगोळी काढण्यास सन्मेशला पाच तास लागले. पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर शिवाजी महारांजांची रांगोळी साकार झाली.

सन्मेश पांडे हा पुण्यातील जेडीआर अभिनव महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मागील चार वर्षांपासून तो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रांगोळ्या साकारत आहे. आज शिवाजी महारांजी साकरलेल्या रांगोळीसाठी त्याला 8 ते 10 किलो रांगोळीचा वापर केला आहे. तर चार वेगवेगळ्या रांगांच्या रांगोळ्यांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. आत्तापर्य़ंत त्याने सभाजी महाराज, शिवाजी महाराज, केशव हेगडेवार यांच्या भव्य आणि दिव्य रांगोळ्या साकारल्या आहेत. आज काढलेली रांगोळी शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केल्याचे सन्मेश पांडे याने सांगितले.

पांडे याने आज साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी देहूहोड आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like