ससून रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र व मानसिक आरोग्याची कार्यशाळा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
मनोविकृतीशास्त्र विभाग ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे आणि मुकुल माधव फौंडेशन व कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ यु. के.( इंग्लंड ) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मानसिक आजार व आरोग्य या विषयावर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे उदघाटन मुकुल माधव फौंडेशनच्या संचालिका रितु छाब्रिया व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले. या कार्यशाळेला मनोविकृतीशास्त्र व इतर मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास १२० जणांनी उपस्थिती लावली.

‘कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’ इंग्लंड या संस्थेच्या मानसोपचार तज्ञांनी कार्यशाळेत मानसिक आरोग्य, उदासीनता, ताणतणावाचे आजार, आत्महत्या तसेच सिझोफ्रेनिया या आजारांवर मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि या कार्यशाळेनंतर मनोविकृतीशास्त्र विभाग ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे याचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की,”नेहमी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतील व त्यामुळे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती व उपचार करण्याचे कौशल्य वाढण्यास मदत होईल.”

Loading...
You might also like