सुशांत च्या शरीरात विष नाहीच, अंतिम व्हिसेरा रिपोर्ट CBI च्या हाती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपास पूर्ण झाला आहे. एम्स रुग्णालया(AIIMS Hospital ) नं सीबीआय(CBI)ला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालाच्या आधारेच आता सीबीआय पुढील तपास करणार आहे. सुशांतचा मृत्यू कशामुळं झाला हे आता समोर येण्याची शक्यता आहे. सुशांतला विष देण्यात आलं होतं का ? याचं उत्तर या अहवालात मिळालं असलं तरी अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.

सीबीआयनं एम्स डॉक्टरांचं पथक तयार केलं आहे. या पथकात एम्सच्या चार डॉक्टरांचा समावेश असून डॉक्टरांच्या या पथकाचं नेतृत्व डॉ सुधीर गुप्ता यांनी केलं आहे. डॉक्टरांच्या या टीमनं सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं विष किंवा विषारी पदार्थ आढळला नाही असं स्पष्ट केलं आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या टीमकडून सुशांतचा ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेंसिक अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे.

कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. कूपर रुग्णालय आणि येथील डॉक्टरांवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळं सीबीआयनं तपास हाती घेतल्यानंतर कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनाची फेरतपासणी केली. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांनी पुन्हा तपासला आहे. याचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला असला तरी कूपर रुग्णालयाला क्लीन चीट देण्यात आली नाही असंही एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like