स्थायी समितीच्या सदस्यपदी राजेंद्र गावडे आणि करुणा चिंचवडे यांची निवड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

राहुल जाधव आणि शितल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या सदस्य पदावर आज सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी महापौर नितिन काळजे,आयुक्त श्रवण हर्डीकर आणि नगरसेवक उपस्थित होते.