हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन

भारिप बहुजन महासंघ युवा शाखा हदगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा युवा अध्यक्ष दिलीप मोरे यांच्या उपस्थितिमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आशोक नरवडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शौ. मैनुभई , बाबासाहेब दौंडे, बाळासाहेब कदम, प्रकाश नरवडे, पंकज नखाते, शे.रहीम भाई, अविनाश कदम, तुकाराम कदम आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक व सुत्रसंचालन लक्ष्मण कदम यांनी केले तर आभार सुरेश लालझरे यांनी मानले. सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सुरेश भालेराव, गणेश डोले, राजेश वामन, तुकाराम कदम, मधुकर महाराज नखाते, शेख अहेमद, राजेश नखाते आदींनी परीश्रम घेतले.

You might also like