होळीच्या रंगात रंगले गुगलचे डूडल

मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात होळी आणि धुळवडी उत्साहात साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी रंग खेळून देशभरात आनंद साजरा केला जातो. गुगलकडूनही हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गुगुलने डुडलच्या माध्यमातून रंगांची उधळण करत देशवासीयांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ढोल वाजवणारी, पिचकारी उडवणारी, रंगांची उधळण करणारी विविध माणसे या डुडलमध्ये दिसतात. या डुडलवर क्लिक केल्यावर होळी या सणाविषयी सगळी माहिती जगभरातील नागरिकांना वाचता येऊ शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like