‘तिने’ बोलणे बंद केल्याने बदनामी करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणीशी मैत्री केल्यानंतर तिच्यासोबत गोव्याला फिरायला जाऊन तिचे एकांतात फोटो काढले. त्यानंतर तिने बोलणे बंद केल्याने तिचे फोटो फेसबुक, व्हाट्स अपवर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल बाळासाहेब आडके (वय २८, रा. शिखर शिंगणापूर जि. सातारा) या तरुणाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल आडके याने तक्रारदार तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर काही दिवसांनी तो मैत्रिणीसोबत गोव्याला फिरण्यासाठी गेला. त्यानंतर तेथे गेल्यावर तिचे एकांतातील फोटो काढले. काही दिवसांनी तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे त्याने तिचे फोटो व्हाटस अप, फेसबुक आणि नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

Loading...
You might also like