त्यांचं अबतक ५६ झाल्याशिवाय राहणार नाही, विनोद तावडे बरसले

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – ५६ संघटना एकत्र येऊन ५६ इंचासमोर टिकू शकत नाहीत. त्यांचं अबतक ५६ झाल्याशिवाय राहणार नाही अशी कोपरखळी तावडे यांनी मारली. तर शरद पवार जे बोलतात ते त्याच्या उलट करतात. ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही घेत आहोत. विखे यांच्या पोराला घेतलं. मात्र लातुर च्या पोरांना आम्ही घेणार नाही असा चिमटा त्यांनी लातूर येथील सभेत काढला.

तावडे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या सभेनंतर या ठिकाणी कुठल्याही सभा करण्याची गरज नव्हती. परंतु पहिल्या तीन मध्ये लीड उमेदवाराला निर्धास्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे. लातुर किती मताधिक्याने येतं. याकडे देशाचं लक्ष लागलय असं ते म्हणाले.

काँग्रेसच्या सांगण्यावरून मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावे असे इम्रान खान बोलले. जे इम्रान खान मोदींना भितात ते पुन्हा पंतप्रधान करा बोलू शकता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर घरात भांडण झाले म्हणून कोणी रुसून जातं का ? कन्यादान करायचं म्हणून पुन्हा नवरा बायको एकत्र येतात. तसं शिवसेना आणि भाजपा निवडणूकी अगोदर आम्ही एकत्र आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीपीएल कार्ड दाखवा आयुष्यमान कार्ड मिळवा ५ लाखापर्यंत उपचार मोफत होतात. हे मोदींनी केलं. विदेशात मोदी का फिरतात असं विरोधक विचारतात. मोदी यांनी मैत्री केली, संबंध वाढवले म्हणून सर्वजण आपल्या देशासोबत राहिले. विरोधक म्हणतात मोदी मिठी मारतात मात्र मोदी मिठी मारून सांगतात आमच्या नादी लघु नका असं ते म्हणाले.

Loading...
You might also like