अंगणवाडी सेविकांवरच्या ‘मेस्मा’वर सरकार ठाम

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

अंगणवाडी सेविकांवरचा ‘मेस्मा’ हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक झाले होते. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद पडले. या प्रकरणी सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे.

अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा रद्द करण्यावरून आज विधानसा आणि विधान परिषदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनीही शिवसेनेच्या मागणीला जोरदार समर्थन देत गोंधळ घातला. त्यामुळं विधानसभेचं कामकाज आठ वेळा तहकूब करावं लागलं. अंगणवाडी सेविकांना मदत करण्याची सरकारची भूमिका नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला. तर याबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे.

मंत्रिमंडळात मेस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना मंत्री गप्प का बसले, असा सवाल विखे पाटलांनी केला. विनोद तावडेंनी सरकारची बाजू आक्रमकपणे लावून धरण्याचा प्रयत्न केला. मेस्मा कायदा हटवणं शक्य नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी ठासून सांगितलं. त्यामुळं गदारोळ होऊन कामकाज पुन्हा पुन्हा तहकूब करावं लागलं.