अंजली दमानियांविरोधात खडसेंचा १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. खडसे थोड्याच वेळात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जाऊन, दमानियांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

अंजली दमानिया आपल्या कुटुंबियांची बदनामी करीत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. दमानिया यांच्याविरोधात ते १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. दमानिया या खडसेंवर अनेक दिवसांपासून आरोप करत असल्याने खडसे पोलिसात जाणार असल्याचे बोलले जात आहे.