अकोल्यात भीषण अग्नीतांडव 11 सिलिंडरच्या स्फाेटात 63 झाेपड्या जळून खाक

अकोला: पोलिसनामा ऑनलाईन
अकाेला शहरातील मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका पाठाेपाठ एक असे ११ घरगुती गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने या भागातील संपूर्ण झाेपडपट्टीला अागीचा विळखा पसरला. या आगीत ६३ झाेपड्या जळून खाक झाल्या. यामुळे अनेक गाेरगरिबांचे संसार उघड्यावर अाले. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवित हानी सुदैवाने झाली नाही. मातानगर शेजारी असलेल्या पाेलिस वसाहतीतील लाेकांनाही वेळीच घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात अाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ३० बंबांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून ही अाग अाटाेक्यात अाणली.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एका कुडाच्या झोपडीत महिला स्वयंपाक करीत होती.मात्र त्यांच्या झाेपडीतील गॅस सिलिंडर लिक झाल्याने कुडाने पेट घेतला व काही क्षणातच संपूर्ण झाेपडी अागीत भस्मसात झाली.कसाबसा जीव वाचवून झाेपडीबाहेर पडलेल्या महिलेने अारडाअाेरड केली,त्यामुळे परिसरातील लाेक जमा झाले. मात्र त्यापूर्वीच अागीने लागून असलेल्या सुमारे ६३ झाेपड्यांना कवेत घेतले.काही क्षणातच या सर्व झाेपड्या जळून खाक झाल्या.या वेगवेगळ्या झाेपड्यांमधील ११ सिलिंडर फुटल्याने अागीची तीव्रता वाढली.